पुणे ः कल्याण येथील सुप्रसिद्ध शिल्पकार सिद्धार्थ वामन साठे यांनी साकारलेल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास दि आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कला प्रदर्शनात उत्कृष्ट सहभाग शिल्प पारितोषिक जाहीर झाले आहे.
देशातील एक अग्रगण्य आणि मानाची संस्था असा लैकिक असणार्‍या दि आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे 103 वे कला प्रदर्शन नुकतेच ऑनलाइन भरविण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या प्रदर्शनात देशभरातून शेकडो चित्रकार आणि शिल्पकारांनी त्यांच्या कलाकृती पाठवल्या होत्या. चित्र आणि शिल्प विभागात स्वतंत्र पारितोषिके दिली जातात. यंदा शिल्पकृतीसाठी सिद्धार्थ साठे यांनी साकारलेल्या लोकमान्य टिळक यांच्या शिल्पाचा उत्कृष्ट सहभाग कलाकृती म्हणून गौरव झाला आहे.
आनंदासाठी शिल्प साकारले
शालेय जीवनापासूनच लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आकर्षण आहे. त्यामुळे लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त प्रारंभी एक ते सव्वा फुटाचे लोकमान्यांचे मातीचे शिल्प साकारले. नंतर त्याचे जिप्सम्मध्ये रूपांतर केले. लोकमान्य हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने तन आणि मनाने सुमारे महिनाभराच्या कालावधीत हे शिल्प साकारले आहे. सन 1997 मध्ये जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेऊन बाहेर पडलो. तेव्हापासून विविध प्रकारची शिल्प साकारण्याची आवड जोपासली आहे. लोकमान्यांच्या शिल्पाला दि आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे पारितोषिक मिळाले याचा मनस्वी आनंद आहे. – सिद्धार्थ साठे, शिल्पकार, ठाणे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा