पुणे ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावला आळा घालण्यासाठी आज (शनिवार) पासून सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेतच दुकाने सुरू असणार आहेत. मात्र कामगार, बाहेरगावाहून येणारे ग्राहक, माल घेऊन येणारे वाहन चालकांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी घाऊक बाजार परिसरातील हॉटेल्स सुरू ठेवण्याची विनंती दि पुना मर्चंटस् चेंबरतर्फे प्रशासन व शासनाला करण्यात आली आहे.
कोरोनाबाबत खबरदारी म्हणून पालकमंत्री आणि प्रशासनाने सायंकाळी 6 ते सकाळी सहा यावेळेत निर्बंध अधिक कडक केले आहेत. मात्र सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचे दि पुना मर्चंटस् चेंबरतर्फे स्वागत करण्यात आले आहे. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, चित्रपटगृह, नाट्यगृहे, पीएमपी बस सेवा 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कामगारांची गैरसोय होणार आहे. हॉटेल व रेस्टॉरंट बंद असल्याने बाहेर गावाहून येणार्‍या ग्राहकांची व माल घेऊन येणार्‍या गाडीवाल्यांचीही गैरसोय होणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी घाऊक बाजाराच्या परिसरात असलेले हॉटेल्स शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून चालू ठेवण्यास परवानी द्यावी. अशी विनंती दि पुना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटला ओस्तवाल यांनी केली आहे. तसे झाल्यास कामगार, ग्राहक, गाडीवाल्याची गैरसोय दूर होईल. अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत सुरू राहिल. आणि बंदचेही पालन होईल. असेही ओस्तवाल यांनी नमुद केले.
पुणे व्यापारी महासंघाचा विरोध
उन्हाळ्यामुळे ग्राहक दुपारी घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे नेमके ग्राहक घराबाहेर पडण्याच्या वेळी दुकाने बंद असणार आहेत. बंदच्या निर्णयामुळे व्यापारी आणि ग्राहकांना फटका बसणार आहे. प्राशासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत व्यापार्‍यांत नाराजी पसरली आहे. बंदमुळे व्यापार्‍यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे या मिनी लॉकडाऊनला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध आहे. – महेंद्र पितळिया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा