८-१० दिवसांनंतर आणखी एक शस्त्रक्रिया होणार

मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर मंगळवारी पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांचा पोटदुखीचा त्रास थांबला आहे. येत्या 8 ते 10 दिवसात त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करून पित्ताशय काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. पवार यांच्या पित्ताशय नलिकेत खडे आढळले होते. त्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र एन्डोस्कोपीद्वारे हे खडे काढण्यात आले आहेत. आता त्यांना आराम वाटत आहे. त्यांचा पोटदुखीचा त्रासही थांबला आहे, असे टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा