पुणे : पुण्यात सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लशीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. त्यात ६० पेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि 45 ते 59 वयातील इतर व्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. काही दिवस ज्येष्ठ नागरिकांच्या लशीकरणाचा गोंधळ महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुरू होता. ही परिस्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने तातडीने लशीकरण केंद्रांची संख्या वाढविली.

खासगी रुग्णालयांमधून प्रति डोस २५० रुपयांना मिळेल. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. सरकारी यंत्रणांमधून सुरू असलेल्या लशीकरण केंद्रांमध्ये मोफत लस घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

अशी करा नावनोंदणी

  • नावनोंदणीसाठी www.cowin.gov.in या वर लॉग इन करा किंवा Cowin app वापरा
  • रजिस्ट्रेशनवर क्लिक करून मोबाईल क्रमांक टाका
  • त्यानंतर गेट ‘ओटीपी’वर क्लिक करा
  • ‘एसएमएस’च्या माध्यमातून आलेला ‘ओटीपी’ नंबर टाकून ‘व्हिरिफाय’ करा
  • ‘ओटीपी’ची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर ‘रजिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिनेशन’ पान येईल
  • यात वय आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र निवडा
  • जन्मवर्ष, लिंग, सहव्याधी असा सर्व तपशील नोंदणी करताना भरावा
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर माहिती दिसेल

अत्यावश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, वयाचा पुरावा असलेले ओळखपत्र
(जन्म दाखला, पॅन कार्ड, पारपत्र)

45 ते 59 वर्षे वयातील व्याधीग्रस्त नागरिकांनी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने दिलेले प्रमाणपत्र केंद्रावर बरोबर आणावे. ज्येष्ठांसाठी ‘वॉक इन रजिस्ट्रेशन’ पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना को-व्हिन पोर्टल नावनोंदणी करताना अडथळे येत असल्याने महापालिकेने ही ‘वॉक इन रजिस्ट्रेशन’ची सुविधा उपलब्ध केली आहे. कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ, जयाबाई सुतार रुग्णालय, कोथरूड, राजीव गांधी रुग्णालय, येरवडा, ससून रुग्णालय या केंद्रांवर नावनोंदणी करून लस मिळेल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा