पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणार्‍या 47 हॉटेलवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामध्ये फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली, रूपालीसह गुडलक कॅफेचा समावेश आहे. यानंतर हॉटेलचालकांचे धाबे दणाणले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर शासन आणि प्रशासनाने हॉटेल, मंगल कार्यालये यांना स्पष्ट सूचना करताना नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले. नागरिकांसह व्यावसायिकांनाही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतरही, काही हॉटेल व्यावसायिकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे कारवाईनंतर समोर आले आहे.

गेल्या चार-पाच दिवसांत शहरातील अनेक हॉटेलची आरोग्य विभागाच्या पथकाने पाहणी केली. त्या वेळी येथे नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून आले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा