नवी दिल्ली : कृषी आंदोलनाशी संबंधित ‘टूलकिट’ प्रकरणी पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला एक दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. सह आरोपीसोबत दिशाची चौकशी करता यावी, यासाठी पोलिस कोठडीची मागणी दिल्ली पोलिसांनी केली होती. दरम्यान, याआधी, सुनावलेली तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी काल संपणार होती. त्यामुळे दिशाला दिल्ली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याआधी, दिशाला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, दिशाने जामिनासाठी अर्ज केला आहे. शनिवारी न्यायालयाने दिशाच्या अर्जावर सुनावणी घेताना निर्णय राखून ठेवला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा