भाजपचे आंदोलनही स्थगित

मुंबई, (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध नेत्यांनी व मंत्र्यांनी आपले दौरे, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. भाजपनेही विजेच्या प्रश्नासाठी होणारे जेलभरो आंदोलन स्थगित केले आहे. मनसेने मात्र कोरोनाच्या वाढलेल्या आकड्यांबाबतच संशय घेताना नेमका अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना कसा वाढतो, असा सवाल करत सरकार जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याचा आरोप केला आहे.

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या परत वाढीला लागल्याने दुसर्‍या लाटेचे संकट समोर उभे राहिले आहे. हे टाळण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर पुढील काही दिवस बंदी घालण्याची घोषणा केली होती. राजकीय पक्षांना व नेत्यांनाही त्यांनी सहकार्याचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार बहुतांश मंत्र्यांनी व नेत्यांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा