कोरोना दक्षता केंद्र पुन्हा सुरू करणार

पुणे : जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता चाचण्यांची संख्या वाढवून बंद करण्यात आलेले कोरोना काळजी केंद्र (कोविड केअर सेंटर) तात्काळ सुरू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले?आहेत. विशेष म्हणजे आवश्यकता भासल्यास शहरात उभारण्यात आलेले जम्बो कोविड सेंटरदेखील सुरू करावे, अशी सूचना पवार यांनी केली आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला ‘मिशन मोड’वर काम करण्यासाठी ग्रामीण भागातील कोरोना केंद्र तात्काळ सुरू करावे, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील कोरोना काळजी केंद्र दोन दिवसांत सुरुरूकरण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यानी पत्रकार परिषदेत दिली.
शहर तसेच ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत पवार यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोना काळात तयार करण्यात आलेले कोरोना काळजी केंद्र आणि जम्बो कोविड सेंटर पूर्णतः बंद करत येथील खाटा, ऑक्सिजन सिलेंडर, इतर वैद्यकीय उपकरणे शासकीय रुग्णालयांमध्ये आहे त्या ठिकाणी हलविण्यात आली होती; परंतु कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने पालकमंत्री पवार यांनी कोरोना काळजी केंद्र कार्यरत करण्याबाबत सूचना केल्या आहेत. सर्दी-खोकला-ताप असणार्‍यांची संशयित म्हणून तात्काळ तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शहराबाहेरून येणार्‍यांची रल्वे आणि बस स्थानकांवर तपासणी करण्याचे?आदेश दिले आहेत. त्यामुळे लक्षणे आढळणार्‍यांना थेट विलगीकरण कक्ष म्हणून कोरोना काळजी केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कमीत कमी 20 व्यक्तींचा तपास घेऊन त्यांचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे. भाजी विक्रेते, फेरीवाले, दूध विक्रेते, पथारीवाले, खाद्यपदार्थांचे स्टॉलधारक, दुकानदार, व्यापारी यांची आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचीदेखील तपासणी करण्याच्या सूचना दिल्याने आरोग्य यंत्रणेला पुन्हा एकदा ‘मिशन मोडवर’ काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या हद्दीतील कोरोना काळजी केंद्र तात्काळ सुरू करण्यात येत मनुष्यबळही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

या परिसरात प्रादुर्भाव जास्त

शहरात मागील परिस्थिती पाहत पुन्हा एकदा भवानी पेठेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, कोथरूड या परिसरातदेखील प्रादुर्भाव जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित करत या ठिकाणीचे कोरोना काळजी केंद्र प्रामुख्याने सुरू करण्यात येणार असल्याचे विभागीय?आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

चाचण्यांची संख्या वाढवणार

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने चाचण्यांची संख्या घटली होती. सद्यःस्थिती पाहता चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यावर भर देण्यात येणार आहे. सद्यःस्थितीला दहा हजार चाचण्या घेतल्या जात होत्या; तीच चाचण्यांची संख्या आणखी एक ते दोन हजारांनी वाढविण्यात येणार आहे. या चाचण्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, बीजे मेडिकल कॉलेज येथून करून घेण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा