लशीसंदर्भात सीरमच्या आदर पुनावालांचा संदेश

पुणे : जगभरातून मोठी मागणी असल्याने सीरमकडे अनेक देशांकडून सारखी विचारणा होत आहे. कोरोना लस कधी देणार, असे प्रश्न विचारले जात आहेत. यावर ‘सीरम’चे कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. ’आदरणीय देश आणि सरकार, जसे की तुम्ही लोक कोविशिल्ड लसीच्या पुरवठ्याची वाट पाहत आहात. मी तुम्हा सर्वांना विनम्रतेने निवेदन करतो की, तुम्ही सर्वांनी धीर धरावा. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारतातील कोरोना लसीकरणाच्या गरजांना प्राथमिकता देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर अन्य देशांच्या मागण्याही पूर्ण करण्यासाठी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहोत.’, असा संदेश आदर पूनावाला यांनी जगाला दिला आहे.

जगभरातून लशीसाठी मोठी मागणी असल्याने सीरमकडे अनेक देशांकडून सारखी विचारणा होत आहे. कोरोना लस कधी देणार, असे प्रश्न विचारले जात आहेत. यावर पुनावाला यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे.

कोणत्याही संकटात काही लोक संधिसाधूपणा करतात, फायदा पाहतात. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड कोरोना लसीला जगभरातून मोठी मागणी आहे. भारतात दिली तर कमी रुपयांत आणि जगभरात दिली तर ते देश सांगतील त्या किंमतीला विकत घेतील अशी परिस्थिती आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडनची कंपनी एस्ट्राझिनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन घेत आहे. सीरम भारत सरकारसोबत अन्य बाजारांसाठीही कोरोना लस बनवत आहे. केंद्र सरकारला जुलैपर्यंत 30 ते 40 कोटी डोस द्यायचे आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजनेनुसार देशातील 20 ते 30 टक्के लोकसंख्येला कोरोना लस द्यायची आहे. ऑक्टोबरपर्यंत देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येला कोरोना लस दिली जाणार आहे. तेव्हाच लोकांचे आयुष्य पूर्वीसारखे सामान्य होणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा