पुणे : विज्ञान कथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे जीवन प्रेरणादायी असून त्यांचे साहित्य विज्ञाननिष्ठा जोपासणारे आहे, असे मत श्याम भुर्के यांनी व्यक्त केले.

उत्कर्ष प्रकाशनच्या साहित्यप्रेमी मंडळातर्फे नाशिक येथे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाल्याबद्दल आयोजित ‘आकाशाशी जडले नाते’ कार्यक्रमात भुर्के बोलत होते.

या वेळी उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा. जोशी, दीपक जव्हेरी, गीता भुर्के व परिसरातील नागरिक उपस्थित होते. वयाच्या 21 व्या वर्षी रँग्लर झालेल्या डॉ. नारळीकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच विज्ञाननिष्ठा जोपासण्यासाठी सोप्या भाषेत विज्ञान कथा लिहिण्याबरोबरच मुंबईतील टाटा संशोधन केंद्रातून अनेक संशोधक निर्माण केले. परदेशांत मोठ्या प्रमाणात संधी असूनही ते भारतात परत आले, असे भुर्के यांनी नमूद केले.

पुण्यात विज्ञान संशोधनासाठी आयुकाची स्थापना केली. रूक्ष वाटणारे विज्ञान जनतेपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम केले, असे ते म्हणाले. जोशी यांनी प्रास्ताविक केले. गीता भुर्के यांनी आभार मानले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा