६८ लिंगांना योगदडांच्या साक्षीने तैलाभिषेक

सोलापूर, (सूर्यकांत आसबे) : सोलापूर नगरीमध्ये मंगळवारी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला 68 शिवलिंगाच्या तैलाभिषेकाने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भूकैलासातील सोन्नलगीच्या सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेतील प्रमुख धार्मिक विधींना मंगळवारपासून प्रारंभ झाला.

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला सुमारे साडेनऊशे वर्षांची समृद्ध परंपरा असून, मानाचे सातही नंदीध्वज हे योगदंडाचे प्रतीक आहेत. रूढी, प्रथा, परंपरेनुसार कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात मंगळवारी मानकरी राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या व दुसर्‍या या दोन्ही नंदीध्वज यांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सिद्धेश्वर पूजास्थान येथील शिवलिंगास नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तमध्ये प्रमुख मानकरी व योगदंड घेऊन बग्गीतून 68 शिवलिंगाच्या तैलाभिषेक करण्यासाठी सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. तर तैलाभिषेकला जाण्यासाठी मानकर्‍यासाठी दोन बंदीस्त वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान मानाच्या नंदीध्वजांना साज चढविण्यात आला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा