पुणे : महापालिकेच्या हद्दीमध्ये तेवीस गावांचा समावेश होणार आहे. यासाठी येथील उत्पन्न आिंण अंदाजपत्रकामध्ये तरतूद करणे अपेक्षित आहे. त्यामुळेच यावर्षी 15 जानेवारीला नाही, तर 29 जानेवारीला सन 2021-22 चे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव ाला स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेचे 2020-21 या आर्थिक वर्षांचे पूर्ण अंदाजपत्रक कोरोनाच्या संकटात गेले आहे. या कालावधीत महापालिकेचे उत्पन्न लक्षणीय स्वरूपात घटल्याने मार्चअखेरपर्यंत पालिकेकडून या आर्थिक वर्षात केवळ 20 ते 25 टक्केच विकासकामे केली जाणार आहेत. त्यातच, 2019-20 या आर्थिक वर्षाच्या सुमारे 700 कोटींच्या बिलांची थकबाकीही पालिकेकडून 2020-21 च्या अंदाजपत्रकातून देण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या जमाखर्चाचा ताळमेळ बघता आयुक्तांच्या अंदाजपत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, पालिका हद्दीत नव्याने 23 गावे समाविष्ट होत असल्याने या गावांच्या विकासासाठी आयुक्त किती निधी देणार याकडेही या गावांचे लक्ष लागले आहे.

२३ गावांच्या समावेशाने उशीर

राज्य शासनाने महापालिका हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्याची अधिसूचना 23 डिसेंबर रोजी जाहीर केली आहे. त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या असून 23 जानेवारीपर्यंत मुदत आहे. त्यामुळे, अंदाजपत्रक सादर झाले आणि त्यानंतर 23 गावे आल्यास त्यांच्यासाठी निधीची तरतूद करणे अडचणीचे होईल. त्यामुळे गावे आल्यानंतर त्यांच्यासाठीचा प्राथमिक खर्च लक्षात घेऊन अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद केली जाणार आहे, त्यामुळे आयुक्तांकडून स्थायी समितीकडे 29 जानेवारीपर्यतची मुदतवाढ मागण्यात आली होती. त्यास समितीने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा