मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सिडनी कसोटी सामन्यानंतर आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) कसोटी क्रमवारी जाहीर केली मेलबर्न आणि सिडनी कसोटीत स्फोटक फलंदाजी करणारा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी घेतली. तर विराट कोहलीची एका अंकाने घसरण झाली आहे.

सिडनी कसोटीपूर्वी ऋषभ पंत आयसीसी कसोटी क्रमवारीत 45 व्या स्थानावर होता. तिसर्‍या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 36 आणि दुसर्‍या डावात 97 धावांची विस्फोटक खेळी केली आहे. या खेळीचा फायदा पंतला झाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार ऋषभ पंत 26 व्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताच्या इतर फलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्या क्रमारीत घसरण झाली आहे. विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावरुन तिसर्‍या क्रमांकावर घसरला आहे. तर रहाणे सहाव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर घसरला आहे. चेतेश्व पुजाराच्या क्रमवारीत दोन स्थानानी सुधारणा झाली आहे. पुजारा ताज्या क्रमवारीनुसार आठव्या स्थानावर विराजमान आहे. अव्वल दहा फलंदाजामध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर केन विल्यमसन असून दुसर्‍या स्थानावर स्टिव्ह स्मिथ आहे.

गोलंदाजीच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह आणि अश्विन यांना फटका बसला आहे. बुमराह नवव्या स्थानावरुन दहाव्या स्थानावर पोहचला आहे. तर अश्विन सातव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर पोहचला आहे. जॉश हेजलवूडची तीन स्थानाची प्रगती झाली आहे. हेजलवूड सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.अष्टपैलू खेळाडूंमध्ये रविंद्र जाडेजा दुसर्‍या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण

ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतीच्या चक्रात अडकत आहेत. दोन महिन्यापासून ऑस्ट्रेलियात असणार्‍या भारतीय संघातील आतापर्यंत 9 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. सिडनी कसोटीमध्ये जसप्रीत बुमराहाला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यातच आता मयांक आणि आर. अश्विन यांनाही दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

नेटमध्ये सराव करताना मयांक अगरवालच्या हाताला दुखापत झाली आहे. मयांकची दुखापत गंभीर नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, सामन्याआधी तंदुरुस्त चाचणीनंतर निर्णय होणार आहे. तिसर्‍या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या हनुमा विहारीच्या जागी मयांकला संधी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता मयांकही दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत भर पडली आहे.

तिसर्‍या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी साडेतीन तास मैदानात फलंदाजी करत भारतीय संघाचा पराभव टाळणारा अश्विनही दुखापग्रस्त असल्याचे समोर आले आहे. सिडनी कसोटीनंतर अश्विनचा पाठदुखीचा त्रास वाढला आहे. बुमराह आणि अश्विन बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताकडून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. आता बुमराहनंतर अश्विनलाही दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. अश्विनला दोन दिवस पुर्णपणे आराम देण्यात येणार आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्याआधी बुमराह, मयांक आगरवाल आणि अश्विन यांची फिटनेस चाचणी होणार आहे. त्यानंतर अंतिम 11 जणांची निवड करण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यात दुखापग्रस्त झालेले खेळाडू

शमी, उमेश यादव, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, मयांक अगरवाल आणि आर. अश्विन

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा