वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य जॅमी रस्किन, डेव्हिड सिसिलीन आणि टेड ल्यूकर यांनी महाभियोगाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. या प्रस्तावाला 211 सदस्यांनी पाठिंबा दिला. या प्रस्तावानुसार ट्रम्प यांनी देशद्रोही कारवायांसाठी चिथावणी दिली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, येत्या 20 जानेवारी रोजी जो बायडेन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. मात्र, या शपथविधी सोहळ्याआधी ट्रम्प समर्थकांकडून पुन्हा आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे. एफबीआयने यासंबंधी इशारा दिला असल्याचे वृत्त आहे.

समर्थकांची ‘टिवटिव’ बंद

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता त्यांच्या समर्थकांची ‘टिवटिव’ ट्विटरने बंद केली आहे. ही संख्या काही हजारांच्या घरात आहे! गेल्या आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन संसदेत गोंधळ घातला होता. यात चौघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईमुळे ट्रम्प यांची टिवटिव थांबली असतानाच त्यांच्या समर्थकांचीही टिवटिव बंद झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा