दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये पाच लाखांचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हा नक्षलवादी ठार झाला.

दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्याकडून ९ एमएमचे एक पिस्तुल हस्तगत करण्यात आले. छिकपल आणि मरजूमधील जंगलात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. ज्यामध्ये हा नक्षलवादी ठार झाला.

या आधी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलींचा खात्मा करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या ताब्यातील मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला होता. दंतेवाडा जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये २७ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा