एनसीबीने बजावले समन्स

ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई केल्यानंतर अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचा जावई अडचणीत आला आहे.अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून (NCB) समीर खान यांना समन्स बजावले असून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे पती आहेत.

एनसीबीने वांद्रे येथून ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. यावेळी करण सजनानी याच्याकडून मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात होता अशी माहिती चौकशीत समोर आली. राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत होती असे एनसीबीचे म्हणणे आहे. यानंतर एनसीबीकडून सोमवारी मुच्छड पानवाल्याची चौकशी करण्यात आली आणि नंतर अटकेची कारवाई झाली

तपासा दरम्यान करण सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून २० हजारांचा व्यवहार झाल्याचे समोर आले. ड्रग्जसाठी हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे. समीर खान यांना यासाठीच समन्स बजावले असून चौकशी केली जाणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा