चीन आणि पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनच्या सुरू असलेल्या कुरघोड्या आणि जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून सुरू असलेल्या घुसखोरीवरून चीन आणि पाकिस्तानला लष्करप्रमुखांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. भारतीय जवान सीमेवर दक्ष असून प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. योग्य वेळी सडेतोड उत्तर दिले जाईल, असे लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी सांगितले. पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर सुरू असलेल्या सीमावादावर शांततामय मार्गाने तोडगा निघेल, अशी भारताला अपेक्षा आहे; पण त्याचवेळी लष्कर कुठल्याही अनपेक्षित परिस्थितीचा सामना करण्यासाठी देखील पूर्णपणे सज्ज आहे, असेही ते म्हणाले. देशाच्या उत्तर सीमेवर लष्कर पूर्णपणे सावध आहे, असेही लष्कर प्रमुखांनी वार्षिक पत्रकार परिषदेत सांगितले. चीन सोबत 8 वेळा चर्चा झाली. मात्र, त्यामधून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. वारंवार चीनकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. तर आम्ही पुढील चर्चेची वाट पाहात आहोत. कारवाईपेक्षा संवाद आणि चर्चेतूनच ठोस मार्ग निघेल, अशी सकारात्मक भावनाही नरवणे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा