सोलापूर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांची अखेर भाजपतून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली. भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षाला अडचणीत आणून या पक्षाची प्रतिमा मलीन करण्याच्या कारणावरून काळे यांची भाजपतून हकालपट्टी करण्यात आली.

आमदार सुभाष देशमुख समर्थक राजेश काळे यांनी महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागितली होती. या प्रकरणात काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातून शिस्तप्रिय भाजपची प्रतिमा सोलापूर शहरात मलीन झाली होती.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी काळे यांना कारवाईसंबंधी नोटीस बजावली होती.

काळे यांच्याकडून आलेला खुलासा त्याचबरोबर भाजपचे दोन्ही आमदार आणि महापालिकेतील पदाधिकारी यांचे काळे यांच्या संबंधी मत घेऊन शहराध्यक्ष देशमुख यांनी कारवाईसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे अहवाल पाठवला होता. या अहवालाच्या आधारे चंद्रकांत पाटील यांनी काळे यांची भाजपतून हकालपट्टी केली,असे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा