मुंबई, (प्रतिनिधी) : शॉर्टसर्किट व ट्रान्सफॉर्मर जळाल्याने राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील वीजपुरवठा मंगळवारी बराच काळ बंद झाला होता. वीज नसल्याने मंत्री व सचिवांच्या बंदिस्त कार्यालयात दिवसा काळोख झालाच; पण इंटरनेट, वायफाय बंद पडल्याने कामकाजावरही परिणाम झाला. अखेर सायंकाळपर्यंत परिस्थिती सुरळीत झाली. मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीत सकाळी साडेअकराच्या सुमारास हे शॉर्टसर्किट झाले. मात्र, वेळीच स्वीच बंद करण्यात आल्याने पुढला अनर्थ टळला. दरम्यानच्या काळात मंत्रिदालनासह अनेक कार्यालयांत अंधार पसरला होता. इंटरनेट बंद पडल्याने कामावरही परिणाम झाला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा