परस्पर सहमतीने संबंध

मुंबई, (प्रतिनिधी) : समाज माध्यमांमधून आपल्यावर सुरू असलेले बलात्काराचे आरोप पूर्णतः निराधार आहेत. एका महिलेसोबत आपले परस्पर सहमतीने संबंध होते व या संबंधातून आम्हाला झालेल्या दोन आपत्यांनाही मी माझे नाव दिले. याची कल्पना कुटुंबातील सर्वांना आहे. परंतु, 2019 पासून आपणास सदर महिला व तिच्या बहिणीकडून ‘ब्लॅकमेल’ केले जात आहे. पैशाची मागणी करून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा करताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परिचयाच्या एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात एक तक्रारही केली असून समाजमाध्यमातून अनेक कागदपत्रे उघड केली आहेत. गेले दोन दिवस समाजमाध्यमातून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर धनंजय मुंडे यांनी मौन सोडून फेसबुक पोस्टद्वारे आपली बाजू मांडली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा