बँकॉक : थायलंड खुल्या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू सिंधू आणि साई प्रणित यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डविरुद्ध खेळताना जोरदार सुरुवात केली मात्र त्यानंतर तिने सिंधूला 21-16, 24-26, 13-21 असे हरविले. हा सामना 74 मिनीटांचा सामना झाला. मात्र 74 मिनीटांनंतर सिंधूला पराभूत व्हावे लागले. तर दुसरीकडे पुरुषांच्या पहिल्या फेरीतील सामन्यात साई प्रणितला थायलंडच्या कॅन्टाफोनकडून 16-21,10-21 असे पराभूत व्हावे लागले. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताला निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले.

सायना थायलंड ओपन स्पर्धेत खेळण्याची शक्यता

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू तसेच लंडन ऑलिंपिकमधील ब्राँझ पदक विजेती सायना नेहवालला सुरु होणार्‍या थायलंड ओपन 2021 बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात येईल. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून सायनाचा कोरोना रिपोर्ट् पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले होते. तिला बँकाँकमध्ये 10 दिवस आयसोलेशनमध्ये रहाण्यास सांगण्यात आले होते.

मात्र बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियामधील सूत्रांनी सायनाचा करोना रिपोर्ट् पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तिला उद्यापासून स्पर्धेत सहभागी होता येईल असे सांगितले. बॅडमिंटन असोसिएशनमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त तेथील स्थानिक प्रसार माध्यमांनी दिले आहे.

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सायना नेहवालने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे असे वृत्त त्याआधी देण्यात आले होते.

कोरोनामुळे जवळपास 10 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धाना सुरुवात होत आहे. थायलंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने चीनने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. जगातील अव्वल खेळाडू केंटो मोमोटा कोरोनाग्रस्त आढळून आल्याने जपानने अखेरच्या क्षणी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा