पिंपरी : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -19 वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी शासनानकडून कोविड-19 लसीकरण दि.16 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. लस आरोग्य सेवा देणार्‍या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. शहरात 16 ठिकाणी लसीकरण होणार आहे.

शासनाच्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कोविड -19 लसीकरणासाठी पुढील प्रमाणे 16 लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. नवीन जिजामाता रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, नेहरुनगर दवाखाना, तालेरा रुग्णालय, वाय.सी.एम.रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, ईएसआयएस रुग्णालय, कामत हॉस्पीटल, जुने भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज, अक्वॉर्ड संत ज्ञानेश्वर हॉस्पीटल, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पीटल, स्टर्लिंग हॉस्पीटल ऍण्ड आयुर्वेद मेडिकल कॉलेज, पिंपळे निलख दवाखाना, प्रेमलोक पार्क दवाखाना या ठिकाणी आरोग्य सेवा देणार्‍या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा