पिंपरी : परदेशातून हवाई मार्गे पिंपरी-चिंचवड शहरात आलेले आणि युके स्ट्रेनचे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले तीनही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 14 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना मंगळवारी नवीन भोसरी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला होता. त्यापैकी सात प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) यूके स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले होते. त्यात तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह, तर तिघांचे रिपोर्ट यूके स्ट्रेन इ.1.1.7 करीता पॉझिटीव्ह आले होते. परदेशातून आलेल्या पिंपळे सौदागर येथील या तीनही रुग्णांना 29 डिसेंबर 2020 रोजी नवीन भोसरी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.

महापालिका वैद्यकीय विभागाने त्यांचे नमुने यूके स्ट्रेन तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले होते. 7 जानेवारी रोजी त्यांना नव कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त झाल्याने सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना आता 14 दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे, असे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले. दरम्यान, शहरात मंगळवारी 119 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 220 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा