वॉशिंग्टन : अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी ट्विटरने तब्बल ७० हजार युझर्सचे अकाऊंट बंद केले आहेत. ट्विटरवरील ही खाती ट्रम्प संबंधित कन्टेंट सोशल मीडियावर शेअर करत होते. ट्विटरने अधिकृतरित्या ही माहिती दिली आहे.

ट्विटरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि नुकसान वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ट्रम्प संबंधित कन्टेंट शेअर करणारी हजारो खाती बंद केली आहेत.

अमेरिकेत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी यातील बहुतांश आंदोलकांना आरोपी करण्यात आले आहे. शिंग असलेली टोपी घातलेले डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थकांवर मुद्दामहून प्रवेश निषिद्ध असलेल्या इमारतीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणे, हिंसाचार माजवणे, संसदेचा अपमान करणे यांसारखे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा