पुणे : कोरोना महामारीत मृत्युमुखी पडलेल्या पालिकेच्या सुमारे 44 मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाखांची मदत देण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अखेर मान्यता देण्यात आली आहे. ही मदत सरसकट देण्यात येणार असून मुख्यसभा मान्यता देईल, या भरवशावर ही मान्यता देण्यात आली आहे.

शहरात 9 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला होता. त्यानंतर 25 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात गेल्या महिन्यात शहरातील कोरोना प्रतिबंधाची जबाबदारी महापालिका प्रशासनावर होती. त्यात पालिकेच्या सुमारे 800 हून अधिक कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली त्यात, 44 कर्मचारी मृत्युमुखी पडले. कोरोनाचे रूग्ण शहरात मोठया प्रमाणात सापडण्यास सुरूवात झाल्याने कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी पालिकेने ठराव करून या कर्मचार्‍यांना 1 कोटींचे सुरक्षा कवच देण्याची घोषणा केली होती. त्यात, केंद्राच्या विमा योजनेतून 50 लाख, तर पालिकेकडून 25 लाख आणि एका वारसाला महापालिकेत नोकरी देण्याची घोषणा केली होती. मात्र, हा ठराव करताना तो सप्टेंबरपर्यंत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांसाठीच होता. त्यात, केंद्राच्या विमा या कर्मचार्‍यांना नाकारण्यात आला, तर पालिकेच्या ठरावानुसार, केवळ 15 जणांच्या वारसांनाच महापालिकेस 25 लाखांची मदत देण्यात येणार होती. त्यामुळे प्रशासनाची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे, स्थायी समितीनेच ठराव करून सरसकट सर्व कर्मचार्‍यांना 25 लाखांची मदत देण्याचा प्रस्ताव समितीत ठेवला होता, तो अखेर मान्य करण्यात आला असल्याने कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना मदत मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा