पणजी : कर्नाटकमधील अंकोला तालुक्यात हिल्लूर-होसकांबी गावाजवळ केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाला, त्यामध्ये नाईक यांच्या पत्नी विजया यांचा मृत्यू झाला असून श्रीपाद नाईक जखमी झाले आहेत.

अपघातामध्ये विजया यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली, त्यांना जखमी अवस्थेत अंकोलातील खासगी रुग्णालयात आणताना त्यांचा मृत्यू झाला. गाडीत असलेल्या आणखी एका व्यक्तीचा सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून त्यांना प्रथमोपचारानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

नाईक आणि त्यांच्या कुटुंबातील चार जणांनी येळ्ळापूर येथे सकाळी गंटे गणपतीचे दर्शन घेतले आणि पूजा केली. त्यानंतर हे सर्वजण गोकर्णकडे रवाना झाले. राष्ट्रीय महामार्ग-६३ वरून त्यांच्या गाडीने छोट्या रस्त्यावर वळण घेतले. मात्र तो रस्ता अतिशय खराब होता त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी उलटली. या घटनेचे वृत्त समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. विजया आणि अन्य दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, पोलिसांनी अन्य जखमींना अंकोलातील रुग्णालयात दाखल केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा