नाशिक : कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीचे अध्यक्ष विलास लोणारी यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. रोख 1 लाख रुपये, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ साहित्यिक तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या स्मृतिदिनी 10 मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कै. शिरवाडकर यांच्या प्रेरणेतून जनस्थान आणि गोदा गौरव पुरस्कार वर्षाआड दिले जातात. गेल्या वर्षी जाहीर झालेले; पण कोरोनामुळे राहिलेले गोदा गौरव पुरस्कार शिरवाडकर यांच्या जयंतीदिनी 27 फेब्रुवारी रोजी देण्यात येणार आहेत, अशी माहिती कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा