नवी दिल्ली : देशात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता महाराष्ट्र आणि दिल्लीचीही त्यात भर पडली आहे ! उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्तान, हरयाना आणि केरळमध्ये बर्ड फ्लूची आधीच पुष्टी झाली आहे. दरम्यान, केंद्राकडून वेगवेगळ्या प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनांना ’केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा’कडे दररोज अहवाल पाठण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिसर रोगमुक्त घोषित होईपर्यंत अशाच पद्धतीने अहवाल पाठवण्यात यावेत, असेही निर्देश आहेत. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात असलेल्या कुक्कुट पालन केंद्रात 900 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मुंबईत तीन कावळे, ठाण्यात 15 बगळे, दापोली सहा कावळे, बीडमध्ये 11 कावळे मृतावस्थेत सापडले आहेत. या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणीनंतर या पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू आहे की आणखी काही, हे स्पष्ट होऊ शकेल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा