भाविकांसाठी मंदिर बंद

सोलापूर, (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा 50 जणांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी रात्री उशिरा नियमावली जाहीर केली. यात 50 जणांच्या उपस्थितीत यात्रेतील धार्मिक विधी करावेत, तसेच फक्त मानकरी, पुजारी व एका नंदीध्वजामागे 5 जण अशा पद्धतीने यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे गड्डा यात्रा, स्टॉल उभारणे, जनावरांचा बाजार रद्द करण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी मंदिर बंदच ठेवण्यात आले आहे.

काल श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या पूजनाने ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला प्रारंभ झाला. दुपारी शेटे वाड्यात थोबडे परिवारातर्फे योगदंडाची मानकर्‍यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात येऊन यात्रेची सुरुवात करण्यात आली. बोला बोला एकदा हर्र बोला हर्र सिद्धेश्वर महाराज कि जय जयघोष करण्यात आला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा