जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरामध्ये पोलिसासंह ४२-आरआर आणि सीआरपीएफ-१३० बटालयिनच्या तुकडीने केलेल्या संयुक्त कारवाईत, आज जैश-ए-महंमदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

अवंतीपोरा व त्राल भागातील दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. तसेच, जैश-ए-महंमद संघटनेला संवेदनशील माहिती देखील ते पुरवत होते. या अगोदर दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याच्या आरोपावरून मुंबई हल्ल्यातील सूत्रधार व लष्कर ए तय्यबाचा कमांडर झाकी उर रहमान लख्वी याला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती.

लख्वी हा २०१५ मध्ये मुंबई हल्ला प्रकरणात जामिनावर सुटला होता. दहशतवादविरोधी विभागाने पंजाबमध्ये गुप्तचरांच्या मार्फत मोहीम राबवली होती. त्यात लख्वी हा दहशतवादाला अर्थपुरवठा करीत असल्याचे निष्पन्न झाले होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा