हैदराबाद : भारत बायोटेकची लस घेतल्यानंतर एका स्वयंसेवकाचा भोपाळमध्ये मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता चाचणीसाठी या स्वयंसेवकाला सर्व नियम आणि अटींची माहिती देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच लशीचा डोस दिल्यानंतर पुढील सात दिवसांपर्यंत त्याच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्यात आली होती. या दरम्यान स्वयंसेवकामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रतिकूल परिणाम दिसून आले नाहीत, असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. कोरोना लशीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी हा स्वयंसेवक सर्व निकष पूर्ण करत होता, अशी माहिती भारत बायोटेकच्या अधिकार्‍याने दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा