मुंबई : ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे चिंता वाढलेली आहे. देशात या नव्या विषाणूच्या संक्रमितांची संख्या 100 वर पोहोचणार आहे. अशातच मुंबईतील तीन रुग्णांमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आला आहे. या विषाणूवर अँटिबॉडीजचाही परिणाम होत नाही, अशी माहिती पुढे येत आहे.

मुंबई उपनगरातील खारघरमध्ये टाटा मेमोरियल सेंटरमध्ये कोरोनाचा नवा म्युटेंट आढळून आला आहे. या म्युटेशनला इ484के या नावानेही ओळखले जाते. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, हा दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराशी संबंधित आहे. दक्षिण आफ्रिकेत के417एन, इ484के आणि एन501वाय असे तीन म्यूटेशन आढळून आले होते. यामधील इ484के हा नवा विषाणू मुंबईत आढळून आल्याचे टाटा मेमोरियल सेंटरचे होमियोपॅथी विभागाचे प्रा. डॉक्टर निखिल पटकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, जुन्या विषाणूमुळे शरीरात प्रतिरोधक क्षमतेमुळे तयार झालेली तीन अँटिबॉडी या विषाणूवर प्रभावहीन असल्यामुळे हा नवा विषाणू अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा