लातूर : अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील 350 गावरान कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली असून, पशुवैद्यकीय पथकाने पाहणी करून मृत कोंबड्यांचे नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. कोंबड्या कशामुळे दगावल्या, हे मात्र अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे सांगितले.

लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी येथील सदाशिव केंद्रे यांनी दोन महिन्यांपूर्वी अहमदनगर येथून 800 गावरान कोंबड्यांचे पक्षी आणले होते. त्याचे संगोपन ते करत होते. दरम्यान, शनिवारी सकाळी अचानक त्यातील 350 कोंबड्यांनी माना टाकल्या. सदरील कोंबड्या दगावल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी प्रभोदयमुळे घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली आणि पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना सूचना केल्या.

त्यानंतर लातूर येथील पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश कोकणे, जी.बी. पाटील घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत काही पक्ष्यांचे नमुने घेऊन पुणे येथील विषाणू संशोधन प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.
मयत कोंबड्यांना संबंधित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जमिनीत गाडण्यात आले, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील करण्यात आला आहे. आजारी व सशक्त कोंबड्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांना प्रतिजैविके व औषधोपचार करण्यात आला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा