मुंबई,(प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकार्‍यांनी संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन करतानाच, संपात सहभाग घेतल्यास तुमची सेवा समाप्त करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने अस्थायी सेवेतील डॉक्टरांना दिला आहे.

अस्थायी सेवेवरील वैद्यकीय अधिकार्‍यांची सेवा नियमित करून शासकीय सेवेत समाविष्ट करावे, तसेच त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी 1 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत काळ्या फिती लावून काम केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा