पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा टॉप ऑफ दी टेबल (टीओटी) आणि बेस्ट फायनान्शिअल डिस्ट्रीब्युटर (२०२०) साठीचा पुरस्कार विमा सल्लागार राहुल बोरूंदिया आणि पत्नी सोनाली यांना प्राप्त झाला आहे.  बोरूंदिया हे गेले २५ वर्षे गुंतवणूक सल्लागार म्हणून काम पाहत असून सध्या आदित्य बिर्ला सनलाईफमध्ये विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. 
टॉप ऑफ दी टेबल हा पुरस्कार विमा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींसाठी प्रतिष्ठेचा समजला जातो.  आदित्य बिर्ला सनलाईफमध्ये पुणे विभागात व देशात हा पुरस्कार प्राप्त करणारे आदित्य बिर्ला कॅपिटलमध्ये बोरूंदिया हे पहिलेच दाम्पत्य विमा प्रतिनिधी ठरले आहे. तर मुलगी कोमल यांना देखील चालू वर्षीचा एमडीआरटी (मिलियन डॉलर राऊंड दी टेबल) पुरस्कार प्राप्त झाला आहे ; असे तिन्ही आतंरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे बोरूंदिया कुटुंब पहिलेच आहे.  मागील पाच वर्षामध्ये दोन वेळा कोर्ट ऑफ दी टेबल (सीओटी), तीन वेळा एमडीआरटी आणि तीन  वेळा  टीओटी हा पुरस्कार मिळविण्याचा विक्रम सोनाली आणि राहुल यांच्या नावावर आहे.  पुण्यातील बोरूंदिया कुटुंबिय हे गुंतवणूक क्षेत्रातील प्रसिद्ध नाव असून टिंगरे नगर येथे त्यांचे कार्यालय आहे. गुंतवणूक कशी करावी, त्याचे परतावे कसे मिळवावेत याबाबतचा सल्ला देतात.
प्रतिकूल परिस्थितीत कामातील सातत्य, चिकाटी, विश्वास आणि कुटुंबियांची भक्कम साथ असल्यानेच मला हे यश प्राप्त झाले असल्याचे बोरुंदिया सांगतात. एकाच कुटुंबातील दोन टीओटी आणि एक एमडीआरटी होण्याचा बहुमान आदित्य बिर्ला कॅपिटल ऑल इंडियामध्ये राहुल यांच्या नावावर आहे. २०१५  पासून ते सातत्याने टीओटी, सीओटी आणि सीइओ प्रीमियर लीगमध्ये आहेत. दरम्यान, गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असताना रक्तदान शिबीर, गो-शाळा पालनास मदत असे विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. कंपनीच्या माध्यमातून राहूल यांनी ग्रीस, इटली, दुबई, सिंगापूर, चीन, स्वीडन, बाली, केपटाऊन आदी ठिकाणचे दौरे केले आहेत. राहूल बोरूंदिया आदित्य बिर्ला सनलाईफचे एचएनआय इन्वेस्टर आहेत. आदित्य बिर्ला सनलाईफचे पुणे विभागात टीओटी पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले सल्लागार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा