देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतची पोलीस चौकशी होणार आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल आज त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्या. सध्या कंगना व रंगोली यांचे पोलीस स्टेशनच्या आवारातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणे, द्वेष पसरविणे यामुळे कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी तिला ३ ते ४ वेळा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, त्याकडे कंगनाने दुर्लक्ष केले होते. अखेर आज स्वत: कंगना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली.

आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिने वांद्रे न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कंगना व रंगोली या दोघींना अटकेपासून संरक्षण देत आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कंगना आज पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा