मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. येत्या सोमवारी (दि.11 रोजी) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश इडीने दिले आहे. दोनच दिवसांपूर्वी वर्षा राऊत यांची ईडीने साडेतीन तास चौकशी केली होती. नियोजित वेळेच्या एक तास आधीच त्या इडीच्या कार्यालयात दाखल झाल्या होत्या. पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) गैरव्यवहार प्रकरणात वर्षा राऊत यांची चौकशी झाली होती. याच प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी इडीने अटक केली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा