मुख्यमंत्र्यांचे केंद्र सरकारला स्मरणपत्र

मुंबई, (प्रतिनिधी) : औरंगाबादच्या नामांतरावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवलेला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत अधिसूचना काढा, असे पत्र केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्र्यांना पाठवले आहे.

औरंगाबाद विमानतळाचे संभाजीनगर नामकरण करण्याबाबतचा ठराव मागच्या वर्षी विधिमंडळाच्या अंदाजपत्रकी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केला होता. त्याबाबत अद्याप केंद्राने निर्णय घेतलेला नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा