पुणे : पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने पुणे आणि परिसरात गुरूवारी जोरदार पाऊस पडला. ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. विविध प्रकारच्या व्यवहारही परिणाम झाला. रात्री उशीरापर्यंत शहरासह उपनगरात पावसाची रिपरिप सुरूच होती.
शहर आणि परिसरात काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर काही भागात पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतरही आकाशात ढग कायम होते. ऐन कार्यालये सुटण्याच्या वेळेत पुन्हा पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे घराकडे निघालेल्या अनेकांना भिजतच घर गाठावे लागले. पावसामुळे शहरातील टिळक रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वरून पाऊस आणि वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेकांना अडथळ्यांचा सामना करीत घर गाठावे लागले. शहरात मध्यम स्वरूपाचा, तर उपनगरात जोरदार पाऊस पडला. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोराचा पाऊस पडला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा