थोरातांनाच कायम ठेवण्याची समर्थकांची मागणी

मुंबई, (प्रतिनिधी) : पुढील वर्षभरात होणार्‍या महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकांचा विचार करून पक्षाला पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष देण्यासाठी काँग्रेसमध्ये सध्या चाचपणी सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच.के. पाटील सध्या मुंबईत असून, त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व वरिष्ठ मंत्री आणि नेत्यांशी चर्चा केली. थोरात यांनी स्वतः जबाबदारीतून मुक्त होण्याची तयारी दर्शवली असली, तरी गटातटाचे राजकारण नको असेल, तर त्यांनाच कायम ठेवावे, अशी मागणीही अनेकांनी केली आहे.

प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्याकडे महसूलमंत्रिपद, तसेच पक्षाचे विधिमंडळ पक्षनेतेपद अशी तीन महत्त्वाची पदे आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी वेगळ्या व्यक्तीकडे देण्यात यावी, अशी चर्चा काँग्रेस पक्षात सुरू आहे. काही लोकांनी यासाठी मध्यंतरी दिल्ली वारीही केली. थोरात यांनीदेखील काल दिल्लीत भेटीगाठी घेऊन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. बदल करायचाच असेल, तर नवीन आणि तरुण चेहर्‍याच्या हाती ही जबाबदारी सोपवावी, असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये खलबते सुरू झाली आहेत. नवीन प्रदेशाध्यक्ष नेमायचा असेल, तर कोणते पर्याय आहेत, त्यांच्याबद्दल इतरांची भूमिका काय आहेत? याची चाचपाणी एच.के. पाटील यांनी सुरू केली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा