मुंबई : मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याविरोधात फेब्रुवारी 2020 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 22 डबेवाल्यांच्या नावावर कर्ज घेतल्यानंतर त्यांना पैसे दिले नव्हते. मुंबईतील डबेवाल्यांच्या एका संघटनेने तळेकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तळेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. तळेकर यांचे साथीदार विठ्ठल सावंत यांचा पोलिस शोध घेत आहेत. सध्या सावंत फरारी असल्याचे समजते. 2015 मधील हे प्रकरण आहे. तळेकर आणि इतर आरोपींनी काही डबेवाल्यांना दुचाकी मोफत देण्याचे प्रलोभन दिले होते. त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले होते, तसेच इतर कागदपत्रेही घेतली होती. त्यांच्याकडून सह्या घेतल्या होत्या. मात्र, बरेच दिवस झाले तरी दुचाकी मिळाल्या नाहीत. त्यांनी दुचाकींची मागणी केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा