सोलापूर, (प्रतिनिधी) : अकलूज ग्रामपंचायतीची जागा बिनविरोध झाल्याचा ठपका स्वतःवरच ठेवत विरोधकांचा विजय झाल्याच्या नैराश्येतून व त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय सन्यासघेणार असल्याची धक्कादायक घोषणा धैर्यशील मोहिते-पाटील यांनी बुधवारी अकलूज येथे पत्रकार परिषदेत केली.

अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या पत्नी उर्वशीराजे या प्रभाग क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून आल्या. त्यांच्या विरोधात धैर्यशीलमोहिते-पाटील आणि त्यांच्या पॅनलने एका सामान्य फळ विक्री करणार्‍या महिलेला उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आपल्या नावावर बागवान नावाचा इसम त्या महिलेकडे जाऊन दोन कागदावर संबंधित महिलेच्या साह्य घेतल्या आणि त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. तर संबंधित महिला उमेदवाराच्या डमी अर्जामध्ये जातीय प्रवर्गाचा उल्लेख देखील वकिलाकडून चुकीचा झाला. त्यामुळे या ठिकाणी आमच्या पॅनलचा उमेदवार राहिला नाही. प्रसंगी विरोधी उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही सर्वस्वी जबाबदारी मोहिते-पाटील गटाचा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रमुख म्हणून आपली आहे. झालेल्या चुकीची जबाबदारी स्विकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय सन्यास घेत आहोत. तत्पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीतील इतर सर्व उमेदवारांचाप्रचार 15 जानेवारीपर्यंत आपण ताकतीने करू. त्यांना निवडून आणू . मगच राजकारणातूनबाहेर पडू असे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा