सोलापूर : अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना शहराच्या ‘क्राइम ब्रँच’ने थरारक पाठलाग करून अखेर अटक केली. सोलापूर महापालिका अधिकारी पांडे यांना त्यांनी शिवीगाळ केली होती. या प्रकरणी सदर बाजार पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता.

राजेश काळे यांच्याविरोधात २९ डिसेंबर रोजी सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून काळे फरार होते. त्यांच्या अटकेसाठी पथके नेमली होती. गेल्या आठ दिवसांत काळे यांनी सातारा, पुणे आणि परभणी या जिल्ह्यांत प्रवास केला होता, अशी माहिती आता समोर येत आहे. आज, मंगळवारी अखेर त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले. पुणे ते टेंभुर्णीपर्यंत थरारक पाठलाग करून त्यांना अटक करण्यात आली.

सोलापूर महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. विवाह सोहळ्यात सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात राजेश काळे यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन करून शिवीगाळ केली होती. पांडे यांनी याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर काळे फरार होते. या काळात त्यांनी पुणे, सातारा आणि परभणीमध्ये वास्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. पथके त्यांचा शोध घेत होते. त्याचवेळी खबऱ्यांमार्फत आणि तांत्रिक मदतीने त्यांचा ठावठिकाणा लागला. पुणे ते टेंभुर्णी असा पाठलाग करून सिटी क्राइम ब्रँचने त्यांना अटक केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा