मुंबई : सासू-सासर्यांनी टोमणे मारणे वा उपरोधिकपणे बोलणे हा संसाराचा भाग आहे, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायालयाने मलबार हिल येथील वृद्ध दांपत्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. या दांपत्याच्या विभक्त झालेल्या सुनेने त्यांच्याविरोधात वाईट वागणूक दिल्याची पोलिसांत तक्रार नोंदवली होती.
सुनेने केलेले आरोप हे सामान्य स्वरूपाचे आहेत. सासू-सासर्यांनी उपरोधिकपणे बोलणे वा टोमणे मारणे हे चित्र बहुतेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे सुनेने केलेल्या आरोपांसाठी वयोवृद्ध सासू-सासर्यांना पोलीस कोठडी सुनावणे आवश्यक वाटत नाही, असे विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी अर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना नमूद केले.