सोलापूर : सोलापुरात ५१० जणांनी सिग्नलचे नियम तोडले. वर्षभरात. तर ४८७१ जणांनी भरधाव वेगात वाहने चालवली आहेत. तसेच ३१ पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला दिल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. पालकांवर न्यायालयात खटले दाखल करून त्यांच्याकडून ३१ हजाराचा दंड वसूल केला आहे.
१ जानेवारी ते २८ डिसेंबर २०२० या कालावधीतील कारवाईची माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक संतोष काणे यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिली आहे.

कुठल्या कलमाखाली किती वाहनांवर कारवाई झाली ती माहिती याप्रमाणे : मद्यसेवन करून वाहन चालवणे ११६, लेन कटिंग ३५, अतिवेगात वाहन चालवणे ४८७१, मोबाइलवर बोलत वाहन चालवणे ३७८०, विना हेल्मेट ३११, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे २८०३, धोकादायक वाहन चालवणे २०३६, सिग्नल तोडणे ५१०, मद्यपान करणे, विना हेल्मेट आणि मोबाइलवर बोलणे असे ८८१ वाहनचालकांचे तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द, रिक्षात टेप लावल्यामुळे ७९ वाहन चालकांवर ई चलान दंड करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा