कोरोना विषाणूच्या संसर्गाचा आणि प्रसाराचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनामुळे जगभरात नवा पेच निर्माण झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या या नवीन प्रकाराचे आतापर्यंत १६ देशात पोहोचला आहे. त्यानंतर आता देशाच्या राजधानीत विषाणूच्या नव्या प्रकाराने प्रवेश केला आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी याबाबतची माहिती दिली.

“दिल्लीतील कोरोनाबाधित रूग्णांपैकी चार रूग्णांच्या अहवालात विषाणूच्या नव्या प्रकाराची लक्षणे आढळली. त्यामुळे दिल्लीत येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. आता दिल्लीत नव्याने कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जाणार नाही. जे लोक बाहेर गावाहून किंवा बाहेरच्या देशांतून दिल्लीत दाखल झाले आहेत, त्यांचा आम्ही मागोवा घेत आहोत”, अशी माहिती सत्येंद्र जैन यांनी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा