पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १३७ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण संख्या १ लाख ६४ हजार ८७९ इतकी रुग्ण संख्या झाली आहे. तर दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर ४ हजार ३८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनावर उपचार घेणार्‍या २२१ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ५६ हजार ३६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत,अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून उपचारा दरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला. तर ८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८९ हजार ६९३ वर पोहचली असून यांपैकी, ८६ हजार ६१७ जण कोरोनातून ठणठणीत बरे झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६११ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा