समृद्धी धायगुडे

दरवर्षी दिवाळीत प्रत्येक जण नवीन कपडे, भरपूर फटाके, मिठाईची खरेदी करून साजरी करते. मात्र यंदा , यंदा कोरोना काळात दिवाळी अतिशय काळजीपूर्वक आणि सजगपणे साजरी करणे गरजेचे आहे. यासाठी बरेच पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. गरज आहे ती फक्त शोधण्याची आणि बदल स्वीकारण्याची. पर्यावरणाविषयी जागरूक असलेली प्रत्येक व्यक्ती सतत काहींना काही शोधत असते. हा शोध घेताना पर्यावण झाडे,पाणी, यांचा विचार प्रामुख्याने येतो. इकोफ्रेंडली लाइफस्टाइलमध्ये कपडे आकाशकंदील आले, तसेच यंदा बी-बियाणांपासून केलेले फटाके आणि मिठाई देखील आली आहे. त्यामुळे तुम्ही जर ‘ग्रीन दिवाळी’ साजरी करू इच्छिता तर या गोष्टी नक्की आजमावून बघा.

पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी पर्यावरण प्रेमींकडून ‘बीज पर्व’ नावाचा एक प्रकल्प राबवला जात आहे. राखी पौर्णिमेला ‘ग्रॅमार्ट’ प्रकल्पअंतर्गत काम करणारे तन्मय जोशी यांनी या ‘सीड क्रॅकर्स’, ‘सीड स्वीट्स’ याबद्दल माहिती दिली.

वर्षानुवर्षे आतषबाजी आणि धूर निर्माण करणारे फटाके उडवत दिवाळी साजरी होते. या झगमगाटाला एक पर्यावरण पूरक पर्याय म्हणून या ‘बीज पर्वा’ अंतर्गत फटाके आणि मिठाई बनवण्याची संकल्पना आम्ही राबवत आहोत. या कल्पक फटाक्यांच्या निर्मितीसाठी काही आर्टिस्ट मध्यप्रदेशातील चिंचद्वार जिल्हात महिलांना प्रशिक्षण देत आहेत.

कसे करतात ‘सीड क्रॅकर्स’

  • हे फटाके तयार करताना टाकाऊ कागद वेगवेगळ्या प्रकारच्या बियांबरोबर एकजीव केला जातो. या निर्मितीमध्ये साधारण ४० ते ५० कुटुंबे कार्यरत आहेत. ती कांद्याच्या चकत्या करून भूईचक्र, अंबाडी बियांचे बॉम्ब असे केले आहेत.
  • वेगवेगळ्या कागदांच्या कारखान्यातून, छापखान्यातून टाकाऊ कागद गोळा करून त्यात पाणी घालून हाताने भिजवला जातो. त्यानंतर स्थानिक आर्टिस्ट इच्छुक महिलांसाठी छोटी कार्यशाळा घेतात. या कार्यशाळेत आर्टिस्ट त्यांना फटाक्यांचे आकार कसे करायचे आणि ते कसे सजवायचे हे शिकवतात.
  • ही प्रक्रिया थोडी अवघड असते कारण महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, प्राथमिक साधने आवश्यक असते. यात एकच पर्याय असतो एका सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन साहित्याचे सामान वाटप करून घेणे आणि आपापल्या घरी जाऊन बनवणे.
  • येथे तयार झाल्यानंतर हे फटाके थेट ई कॉमर्स साईटवरून ग्राहकाकडे जातात. त्यामुळे यातून मिळणारे उत्पन्न देखील थेट कारागिरांना मिळते. असे तन्मय जोशी यांनी सांगितले.

हे फटाके कसे उडवाल

  • हे दिव्यांचे किंवा प्रकाशाचे फटाके नाहीत त्यामुळे मातीत हे फटाके ठेवून त्यावर थोडेसे पाणी घाला.

कुठे खरेदी कराल ?

तुम्हाला अनोखे फटाके खरेदी करायचे असल्यास ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. ज्यावर बी-बियाणे, झाडे, कॉकपीट याच्याशी संबंधित उत्पादनांची विक्री केली जाते.

या फटाक्यांमागे उद्देश्य एकाच ही दिवाळी सर्वांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूर्वक करावी आणि वृक्षारोपणासाठी लहान मुलांना प्रोत्साहन मिळावे, हा आहे.

‘सीड स्वीट्स

एकीकडे आपण दिवाळीत आकर्षक मिठाईचे बॉक्स, सुक्या मेव्याची खरेदी करतो. तर दुसरीकडे शेतकरी स्थानिक आर्टिस्ट टाकाऊ कागदापासून लाडू, चम-चम लावलेली बर्फी, कुकीज करण्यात व्यग्र आहेत. या सस्वीट्समध्ये माती आणि कॉकपीट यांचे मिश्रण आहे. ही मिठाई काही महिन्यातच रोपटे येते.

प्लम ऑइल फ्री लाडू : हे तेल सर्वसाधारणपणे वेफर्स, इन्स्टंट नूडल्स, आईस्क्रीम, चॉकलेट, टूथपेस्ट काही सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जाते. त्यामुळे हे तेल झाडांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते.ही मिठाई तुम्ही मातीत रोवल्यावर त्यातून काही दिवसांनी टोमॅटो आणि गाजरासारख्या फळभाज्या येतील.

मैद्याशिवाय कुकीज : दिवाळी म्हणल्यावर घरात गोड पदार्थ कुकीज, केक, ब्रेड यांची रेलचेल असते. या कुकीजसाठी लागणारे बाजरी, ज्वारी, गहू यासारख्या पिकांना एका किलोसाठी एक हजार लिटर पाणी लागते. गव्हाच्या पिकानंतर त्यापासून चारा उत्पादन होते. याचा वापर करून कुकीज तयार केल्याने मातीत लवकर विघटन होते. या कुकीज मधून वांगी, पालक यासारख्या भाज्या उगवतील.

साखर विरहित बर्फी : आपल्या देशात सर्वाधिक साखर आणि साखरेपासूनची उत्पादने तयार केली जातात. एक किलो साखरेच्या निर्मितीसाठी पंधराशे लिटर पाणी वापरले जाते. यासाठी लागणारे शेतकऱ्यांना देखील मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा जास्त काम करावे लागते. ही बर्फी मातीत रोवल्यानंतर त्याला थोडे पाणी घालून ओकरा, राजगिऱ्या सारख्या वनस्पती उगवतात.

सॉवरेन चम-चम : ही लोकप्रिय मिठाई दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देश्याने देशात केली जाते. याच आकर्षक मिठाईच्या आधारे सॉवरेन चमचम बीजांची मिठाई केली जाते. यातून मिरची आणि गाजर यासारखी रोपे येतात

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा