पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी उत्तमरीतीने कर्तव्य बजावले आहे. नागरिकांसाठी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे आपण त्यांचे कृतज्ञ आहोत, असे गौरवोद्गार निवृत्त अधिकारी प्रभाकर आणि कला शिक्षिका प्रतिभा भडसावळे यांनी काढले. या वेळी पोलिसांना ग्रंथ भेट देण्यात आले.
कोरोना काळात सर्व नागरिक घरात बसले असताना वेळेचे बंधन न पाळता कर्तव्याला प्राधान्य देणार्‍या पोलीस मित्रांचे वाचनातून अल्प का असेना मनोरंजन व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगत प्रभाकर भडसावळे यांनी पोलिसांना शुभेच्छा दिल्या. या वेळी समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी जगन्नाथ कळसकर, दादा गायकवाड, तसेच इतर पोलीस अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा