मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा संसर्ग बर्‍यापैकी नियंत्रणात आला असून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 85 टक्क्यांपुढे गेले आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 13 हजार 885 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर 11 हजार 447 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत 15 लाख 76 हजार 62 कोरोनाबधित रुग्ण आढळून आले; त्यापैकी 13 लाख 44 हजार 368 जणांनी कोरोनावर मात केली.

राज्यात आतापर्यंत 79 लाख 89 हजार 693 जणांची कोरोना चाचणी झाली. त्यापैकी 15 लाख 76 हजार 62 (19.73 टक्के) रुग्ण पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात 23 लाख 33 हजार 522 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर 23 हजार 409 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात काल 306 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामुळे बळींची संख्या 41 हजार 502 इतकी झाली. राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के इतका आहे. राज्यात सध्या 1 लाख 89 हजार 715 उपचार घेतआहेत. सप्टेंबरमध्ये ही संख्या तीन लाखापर्यंत गेली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा